Skip to main content

REFUTING RUPA KULKARNI: रुपा कुलकर्णी बोधींना उत्तर




नमस्कार।

बौद्ध तत्वज्ञानाचा किंवा बौद्धां मधल्या विभिन्न तत्वज्ञान व मतांचे आणि इतिहासाचे जेवढे विकृतिकरण महाराष्ट्रात आंबेडकरवादी चळवळीच्या माध्यमाने झाले आहे तेवढे नुकसान आंबेडकरवादींचे थेट मानलेले शत्रु सेनापति पुष्यमित्र शुंग (जे स्वतः भारतीय बौद्धांचे समर्थक होते, असो) यांनी सुद्धा केला नसेल! आंबेडकरवादी विचारधारा मुख्यतो एका अनुसूचित जातींच्या "विशिष्ट जाती" पर्यंतच मर्यादित आहे , पण काही अपवाद सापडतात जे त्या विशिष्ट जातीच्या व अनुसूचित जातिवर्गाच्या बाहेरचेही असतात. तश्या अपवादां मधले एक उदाहरण म्हणजे डाॅ रूपा कुलकर्णी बोधी नामक या शिक्षिका आहेत.

यांच्या वैयक्तिक चारित्रा बाबत व कार्यांबद्दल मला फारशी माहिती नसल्या मुळे त्यावर माझी टिका होणार नाही, पण पत्रकार राजू पारुळेकरांबरोबर झालेल्या त्यांच्या मुलाखती मध्ये एवढं जानवलं की डाॅ कुलकर्णी-बोधी जी एका "निधर्मी" ब्राह्मण कुटुम्बात जन्माला आल्या होत्या आणि यांनी नंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तसं यांनी बौद्ध धर्माच्या कोणत्या संघात व कोणत्या पंथ परंपरेत दीक्षा घेतली हे डाॅ जी स्पष्ट सांगत नाहीत, पण हा विषय वेगळा आहे म्हणुन राहू देऊ.
धर्म किंवा तत्वज्ञानाच्या संबंधात त्यांच्याबाबत किंवा कोणाच्याही वैयक्तिक निर्णयांशी मला कोणतीही समस्या नाही, व कोणालाही समस्या नसली पाहिजे, पण या आधारावर हिंदु अर्थात सनातन धर्मावर प्रहार केल्यावर आम्ही ते ऐकून घेणार्यां मधले नाही आहोत व आमच्या धर्म, महापुरुष, संस्कृति आणि इतिहासाबद्दल चुकिच्या गोष्टी व खोटी माहिती पसरवल्यावर आणि बिन कारणाचे संघर्ष निर्माण करायचे हेतू ठेवणार्यांना प्रतिउत्तर देणे आमचा, आणि तसंच सर्वांचा, दायित्व आहे .

डाॅ मेधा कुलकर्णी बोधीजीं ची राजु पारुळेकरां बरोबर मुलाखत ही युट्युब वर दोन भागां मध्ये विभाजित आहे आणि दोन्ही विडियोत डाॅ कुलकर्णी बोधी यांचे अधिकतर वाक्य ऐतिहासिक व दार्शनिक तथ्यांच्या विरुद्ध व कुतर्कांनी भरलेले आहेत पण हा ब्लाॅग पोस्ट संपूर्ण विडियो वर नसून फक्त त्यांचा संवादाचा त्या तुकड्याचा खंडण आहे जो फेसबुक व व्हाॅटसॅप द्वारे आंबेडकरवादी वाईरल करत आहेत.

हा भाग मुख्यतो पहिल्या विडियोच्या 18:00 मिनिटां पासून 22:00 मिनिटां पर्यंत आहे.
ज्यात पारुळेकर हे बोधीजींना गौतम बुद्धांच्या विष्णुचा अवतारवादावर प्रश्न विचारतात आणि कुलकर्णी बोधीजींचे उत्तर मिळाल्यावर त्या संबंधित नवीन प्रश्न विचारतात.

मी या पोस्ट वर बोधीजींचे आक्षेप व दाव्यांवर आणि एका विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत खंडन करायचा प्रयत्न करीत आहे. वाचकांनी या खंडनात्मक पोस्टचा आनंद घ्यावा आणि पोस्टवर एखाद्या तथ्यांवर चुकलो असेन तर पुराव्यां सकट सुधार करुन द्यावे अशी विनंती आहे.

पुर्व पक्ष: डाॅ रूपा कुलकर्णी बोधींचा आरोप (संक्षिप्त मध्ये)-


■ हिंदु धर्म ने सर्वसमावेशक प्रकृतिच्या नावाने बुद्धांना गुंडाळून ठेवला आहे (प्रश्नकरता पारुळेकरांनी प्रश्नात चार्वाक व ऋषि कणादांचा सुद्धा उल्लेख केलेलं आहे पण बोधी जींनी यांचावर उत्तर दिले नाही).
■ एकाही हिंदुच्या घरातल्या देवार्यात हिंदु धर्माने बुद्धांना अवतार मानले असले तरी सुद्धा बुद्धाची प्रतिमा हिंदु परिवारातील देव्हार्यात नसते जसं इतर अवतारांच्या असतात.
■ बौद्ध तत्वज्ञान आमचेच आहे असे हिंदु म्हणतात.
■ शून्यवाद शंकराचार्यांनी बौद्धांकडून उचलले म्हणुन त्यांना प्रच्छन्नबौद्ध म्हंटले जातं.
■ आम्ही हा तत्वज्ञान बुद्धांपासून घेतला हे स्विकार करायला लाज वाटल्या मुळे बुद्धांना अवतार घोषित केलं.
■ बुद्धांना अवतार घोषित करणे श्रमण संस्कृति फोपावू नये यासाठी केलेलं षडयंत्र होते.
■ बुद्धांनी वेद आणि यज्ञचा विरोध करायची बंडखोरी केली.
■ म्हणुन त्याकाळी बुद्धांना विरोध करुन नाही चालणार व हे आमचेच होते असं घोषित केलं गेलं.
■ बुद्धांनी म्हटलेले मी देव नसून माणुस आहे.
■ बुद्धांनी स्वर्ग-नरकाच्या पसार्यातुन बाहेर आणलं.
■ कोणताही माणुस अरहत किंवा सम्यक सम्बुद्ध बनू शकतो, आणि हा तत्वज्ञान क्रांतिकारी परिवर्तन होतं.
🔲 डाॅ रूपा कुलकर्णी बोधी जीं चा आम्हा सर्व हिंदुंना असा प्रश्न आहे की बुद्ध आम्हाला ( म्हणजे हिंदुंना ) आवडत नाही मग आम्ही हिंदु त्यांना अवतार का मानतो?


उत्तर पक्ष:- ब्रह्मवीर ऋग्वेदीचा उत्तर-


या एवढ्या आक्षेपांच्या शैलीने समजते की डाॅ रूपा कुलकर्णी बोधी या आंबेडकरवादी विचारधारेतील नवयान नवबौद्ध आहेत.

हिंदु अवतारवादाद्वारे बुद्धांना गुंडाळून ठेवला आहे यांचा पहिल्या आक्षेपाने बोधी जींच्या मनातला द्वेष व संकुचित वृत्तिची जाणिव होते. एक तर यांना पूर्ण माहिती सुद्धा नसेल (एवढा अभ्यास करुन सुद्धा) की हिंदूंमध्ये फक्त वैष्णव परंपरेतले काही पंथच गौतम बुद्धांना विष्णुचा अवतार मानतात. इतर पंथ परंपरे बुद्धांना फक्त एक ऐतिहासिक महापुरुष व योगी या दृष्टिने पाहतात. भारतीय हिंदूंमध्ये वैष्णव बहुसंख्यक आहेत ? की शैव की इतर कोण ? ...असा आज पर्यंत सर्वेक्षण झालेला नाहिए पण वैष्णव बहुसंख्यक असतिल असा हवेत तीर मारलेला अनुमान सुद्धा सत्य मानत असेल तरी हिंदू वैष्णवांनी तुमच्या धर्मगुरुंना आपलंसं मानून राम, कृष्ण इत्यादिंच्या तुलनेतंच अवतार बनवला हे बोधींना गुंडाळणे वाटलं ?

बरं मग बौद्धांनी पाली भाषा, संस्कृत भाषा, ध्यान योग, ब्रह्मा न् शक्र/इन्द्र सकट इतर हिंदू देवी देवता व यक्ष याक्षिणी इत्यादि गुंडाळून ठेवले हे मान्य करतील का?

मूळात डाॅ कुलकर्णी बोधी जी हिंदूंचा समन्वयवादी (syncretism) पद्धतीला गुंडाळणे म्हणतात पण स्वतः च्या मतामधल्या भिन्न मताचे प्रभावांबद्दल एक शब्द वापरत नाहीत व त्यांना गुंडाळणे म्हणत नाही हा कुलकर्णी बोधी जींचा ढोंगीपणा म्हणू नये का? धर्म तत्वज्ञान तर सोडूनंच द्या इथं तुमचा आंबेडकरवादी समाज साधे हिंदू संत व महापुरुषांना सोडत नाही, ह्याला गुंडाळणे म्हणतील का डाॅक्टर कुलकर्णी बोधी जी?
संत कबीरदास पासून संत रविदास पर्यंत,
गुरु बसवण्णां पासून जगद्गुरु तुकाराम पर्यंत,
शाहू महाराज पासून थेट छत्रपति शिवाजी महाराजां पर्यंत!!
या सर्व हिंदु वैष्णव, शैव, शाक्त आणि वैदिक आर्य समाजी महापुरुषांना आंबेडकरवादी नवबौद्धांनी राजकारणाकरिता खोट्या इतिहासात गुंडाळून ठेवला आहे हे कुलकर्णी बोधी जी नकारणार का?
खरं तर , ना बौद्धांनी हिंदु देवी देवतांना गुंडाळून ठेवलं आहे , ना हिंदुंनी गौतम बुद्ध ना गुंडाळला आहे.

दुसर्या मताच्या महापुरुषाला स्वतः च्या मतामध्ये स्थापित करणे हे जगात सगळ्या प्रकृतिवादी पुरातन संस्कृतिंमध्ये होतं व या मागचे कारण हे आध्यात्मिक व सांस्कृतिक असते.
हिंदुंनी कोणाला अवतार मानायचं की नाही हे काय दूसर्या मत अनुयायींची परवानगी घेऊन करायची का?
बौद्धांनी इतरांचे देवी देवतांना स्वतःचे देवी देवता, धर्मपाल आणि बोधिसत्व म्हणावा हे इतर मतांना विचारुन मांडलं पाहिजे का?
कोणत्याही बुद्धिमान व उदार मनाच्या आध्यात्मिक व दार्शनिक व्यक्तिचा सहज उत्तर 'नाही' असा असणार.!

महापुरुषांवर कोणाचा ठेका नसतो व खास करुन तो माणुस स्वतः च्या संस्कृतिचा असेल व त्याचे अधिकतर शिकवण स्वतः च्या शिकवणींच्या अनुकूल असतील मग तर आजिबातच कोणाचा ठेका नसतो
त्यांनी दूसर्यांना थांबवायचा किंवा गुंडाळून ठेवण्याचे आरोप करायचा.

हिंदु वैष्णवांनी किंवा इतर संप्रदायांनी कोणत्याही बौद्धाला जबरदस्ती स्वतःचे अवतारवाद स्विकार करायला लावल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही!
वैष्णवांनी स्वतःच्या आध्यात्मासाठी व सांस्कृतिक प्रवाहच्या ओळखीसाठी बुद्धांना अवतार मानला हा त्यांचा अधिकार होता व यांचा आधीही गौतम बुद्ध व बौद्धांनी ब्रह्मा व शक्र-इन्द्रां सारखे असंख्य स्वर्गीय व यक्ष देवी देवतां बरोबर जे केलं तेच वैष्णवांनी गौतम बुद्धांबरोबर केलं. या उलट वैष्णवांनी बुद्धांना एखादा विष्णु भक्त किंवा साधा संत किंवा ऋषि न बनवता थेट स्वतःच्या परमात्माचा जन्म म्हणजे अवतारच बनवला ह्याने वैष्णवांचे मन किती उदार होते हे स्पष्ट होते .!

https://encyclopediaofbuddhism.org/wiki/Deva

समन्वय व इतर मताचे पात्रांना आत्मसात करण्याचा विषयात पाहिलं तर थेरवाद बौद्ध धर्मात ईसा नंतर तीसर्या शतकाच्या दीपवंस (९/२४) आणि पाचव्या शतकाच्या महावंस (अध्याय ८) या सिंहल-पाली मिश्रित भाषेतल्या बौद्ध ग्रंथात विष्णुदेवांना "उपुलवान" म्हणजे निळ्या रंगाचा असा म्हणत एक बोधिसत्व आणि धर्मपाल म्हंटल आहे जो बुद्ध-शासन अर्थात बुद्ध-धर्माची रक्षा करतो. इथं बौद्धांनी विष्णु ना धर्मपाल देवता व सिंघल देशाचा आध्यात्मिक रक्षक म्हंटल आहे. तायशो त्रिपिटक (सर्व महायान व वज्रयान बौद्धांचा त्रिपिटक) चा १०५० सूत्र-- कारंदव्यूः सूत्र मध्ये विष्णु नारायण सोबत अनेक प्रमुख हिंदु देवी देवतांना अवलोकीतेश्वराचे अंगाचे उत्सर्जन किंवा अंश मानले आहे. तर हे अवलोकितेश्वर म्हणजे कोण?... याचा उत्तर आहे महायान बौद्ध परंपरेत अवलोकितेश्वर हे प्रधान स्थरावरचे सर्वात महत्वाचे बोधिसत्व मानले गेले आहेत जो भूतकाळ, वर्तमान व भविष्य- सर्वकाळाच्या, सर्वलोकांतल्या बुद्धांच्या व इतर बोधिसत्वांच्या करुणा भावनेचा अवतार असतो. महायान परंपरेशी संबंधिच असणारा वज्रयान परंपरेत अवलोकितेश्वर हा बोधिसत्व नसून एक सम्यक संबुद्ध अर्थात एक निर्वाण केलेला बुद्धच आहे जो महायान परंपरे प्रमाणेच इतर बुद्धांच्या करुणेचा अवतार आहे. बौद्ध धर्माच्या बाहेर डाॅनल्ड लोपेज, ऐलीस गेटी, एलेक्जेंडर स्टडहोम इत्यादि सारखे जे पाश्चत्य विद्वान आहेत यांचा अभ्यासानूसार "अवलोकितेश्वर" हा वैदिक ईश्वरांचा "बौद्ध-करण" / "बोधिसत्वकरण" आहे महायान आणि वज्रयान बौद्धांद्वारे (तिब्बत सकट चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, तायवान आणि विएत्नाम या देशांतले जेवढे बौद्ध आहेत ते सर्व महायान किंवा वज्रयान परंपरेचेच आहेत). "अवलोकितेश्वर" हा स्वतंत्र ऐतिहासिक माणुस नसून एक प्रकाशमय ईश्वर-तुल्य बोधिसत्वच मानला जातो. अवलोकितेश्वर चा शाब्दिक अर्थ सुद्धा "जगाचा निरीक्षण करणारा/पाहणारा ईश्वर" असा होतो. याने स्पष्ट आहे की बौद्धांनी हिंदु वैदिक व अवैदिक देवी देवतांबरोबर वैदिक परमेश्वराचाही बोधिसत्व-करण आणि बौद्ध-देवत्व-करण केलं. आणि ज्यांना खरंच बौद्ध धर्म आणि इतर देशातल्या संस्कृतिचा अभ्यास असेल त्यांना माहिती असत की अवलोकितेश्वराची भक्ति फक्त महायान व वज्रयानच नाही तर थेरवाद बौद्ध सुद्धा करतात. त्यांचा पाली शास्त्रात असो किंवा नसो, सिंघल, थाई व ख्मेर सारखे स्थानिक भाषेतले बौद्ध साहित्यांमध्ये अवलोकितेश्वराचे भक्ति मार्गाचे भरपुर उल्लेख आहेत. म्हणुन महायान, वज्रयान व हीनयान/थेरवाद- या तीनही बौद्ध धर्म परंपरेत वैदिक ईश्वराचा बोधिसत्वकरणाचे भक्ति होते. वैदिक ईश्वर आणि त्याचा बौद्ध रुपांतरात बस एवढं फरक आहे की वैदिक ईश्वर हा सर्वव्यापक असून निराकार असतो जो सृष्टिचा निर्माण करतो, पण बौद्ध अवलोकितेश्वराची फक्त दिव्य दृष्टि सर्वव्यापक असते व हा साकार-निराकार दोन्ही असून सृष्टि चा निर्माता नसतो- कारण बौद्ध तत्वज्ञानात सृष्टि च्या निर्मातेची संकल्पना नसते.

आता आम्हा हिंदुंना बौद्धांच्या या समन्वयवादाशी काहीच समस्या नाही व पुर्वी ही कोणत्याच हिंदु ला काही समस्या नव्हती (एखाद्या विद्वानाला दार्शनिक मतभेद असू शकतं पण तो विषय वेगळा)! उलट असं समन्वयता प्रशंसनीय आहे आणि हिंदु संप्रदाय व परंपरा सुद्धा हेच निरनिराळ्या प्रकारे करतात. पण डाॅ रूपा कुलकर्णी बोधी सारखे काहींना हे दार्शनिक समन्वय गुंडाळपणा वाटते, दूर्दैवाने.
हिंदूंच्या देवघरात बुद्धांची मुर्ती तशीच नसते जशी कोणत्याही वैदिक ऋषि मुनिचे नसते! ऋषि मुनिं व्यतिरिक्त धार्मिक इतिहास व पुराण ग्रंथातले अधिकतर देवी देवतांचे मुर्तया बहुसंख्यक हिंदूंच्या, त्यात ब्राह्मण सुद्धा शामिल, देवघरात सापडत नाहीत. इतरांचा सोडा, फक्त विष्णु पुराणातले विष्णुंचे १० अवतार किंवा भागवत पुराणातले २४ अवतार बघा... राम आणि कृष्ण वगळता दूसरा कोणत्याच अवताराची प्रतिमा अधिकतर हिंदूंच्या घरात सापडणार नाही. पण देवघराच्या बाहेर कोणताही हिंदु बुद्धांच्या मुर्ति समोर नतमस्तक व्हायला लाजत नसतो. त्याला काही अवतार मानत असतील तर काही महायोगी, थोडेफार दार्शनिक मतभेद असले तरी बुद्धांप्रति हिंदुंच्या मनात आदर असतो.

शुन्यवाद आणि आदि शंकराचार्यांच्या दर्शनांचा काडिमात्राचा संबंध नाही. आदि शंकराचार्य हे परब्रह्म-जीवात्मा व यांची अद्वैतता मांडणारे होते. पण शुन्यवादाच्या विपरीत ते ब्रह्म-वादी होते.
कोणताही बौद्ध विद्वान सहमत असेल.
उलट त्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्यात त्यांनी शून्यवादाचा खंडण केले आहे. आता माध्यमिक दर्शनाचे बौद्ध आणि अद्वैत वेदांत मधील हिंदुंच्या ध्यानसंकल्पनेत साम्य आढळतात याचा अर्थ कोणत्या तर्काने होतो की हिंदुंनी बौद्धांकडून हे साधना पद्धति उचलल्या? तसं पाहिलं तर गौतम बुद्धांनी उपदेशीले आर्य-अष्टांगमार्गातले ८ ही नियम हे वेदांमधिल कोणत्या ने कोणत्या मंत्रात सापडतातच. मग, तत्वज्ञान वेदांमधून उचलला याचा बुद्धांना लाज वाटली म्हणुन मूळ वेद आणि ब्रह्मा आमचेच आहेत असा ब्राह्मणधम्मिक सुत्त आणि तेविज सुत्तामध्ये म्हंटल आहे, असा अर्थ लावने योग्य असेल का? बुद्धांनी स्वतः शोधलेला ९ व्या झानं किंवा ध्यान अवस्थेच्या आधिचे ८ ध्यान-अवस्था हे वैदिकांचेच होते. मग आता डाॅ कुलकर्णी बोधी जीं चे कुतर्क इथंही लावावे का?

हिंदु जेव्हा म्हणतात की बुद्ध तत्वज्ञान त्यांचाच आहे व भारतीय बौद्ध मत त्यांचाच (हिंदुचाच) आहे, ते संस्कृति च्या संदर्भात तसं म्हणतात. दार्शनिक मतभेद तर आहेतच हे त्यांना सुद्धा माहिती आहे पण हिंदु या संदर्भात फक्त सांस्कृतिक मूळ एक असण्याच्या संदर्भात बौद्ध मतांना स्वतः चा म्हणतात. इतिहासात पाहिलं तर अनेक क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण हे बौद्ध होते. खरं तर अधिकतर बौद्ध या तीन वर्णाचेच होते. एकाच राजघरान्यात अनेकदा काही राजे हिंदु तर काही बौद्ध व जैन होते. अधिकतर राजे सर्व भारतीय मतांशी संबंधित धार्मिक इमारती उभी करायचे. अनेक बौद्ध लेण्या हे हिंदु राजेंनीच बांधल्या आहेत, त्याच प्रकारे अनेक हिंदु लेण्यां बांधण्यात बौद्ध राजे सुद्धा होते.

अनेक हिंदुंचे, त्यात ब्राह्मण आणि कायस्थांसारखे सवर्णही शामिल, काही पुर्वज बौद्ध दार्शनिक मत ठेवणारे होते व इतर पुर्वज सनातन धर्मीय होते हे तर काही दूसर्या भारतीय मत ठेवणारे होते हे सर्वांना मान्य आहे. मग जसं पूर्व एशिया खंडातल्या देशांमध्ये बौद्ध अल्पसंख्यक असल्यावर सुद्धा तिकडचे शिंटो, शेनीस्ट, शमॅनीस्ट, टाओइस्ट इत्यादि सारखे स्थानिक सनातन धर्मी परंपरा गौतम बुद्ध व बोधिसत्वांना सांस्कृतिक संदर्भात आपलं मानतात तसंच आम्ही हिंदु गौतम बुद्धांना व बोधिसत्व व इतर बौद्ध दार्शनिकांना सांस्कृतिक रुपात त्यांना आमचा मानतो यात गैर काय आहे? डाॅ रूपा कुलकर्णी बोधीं च नेमकं काय इच्छा आहे? हिंदुंनी बुद्धांचा द्वेष करावा का?
बुद्ध या संस्कृतिचे नव्हते असा मत ठेवावा का?
बुद्धांची अधिकतर शिकवण आमच्याशी मिळती जुळती आहे हे आम्ही अमान्य करु का? बुद्ध व बुद्धांचे अनुयायींचा आमच्या संस्कृतिवर प्रभाव आहे हे कोणी नकारले? आदि शंकराचार्य किंवा दूसर्या कोणता एखादा हिंदु विचारवंत आहे का जो असा बोलेल की बौद्धांचा भारतीय संस्कृतित काहीच योगदान नाही? उलट डाॅ रूपा कुलकर्णी बोधी जी सारखेंनाच वैदिक धर्माचा बुद्धांवर व बौद्ध मतावर झालेला प्रभाव स्विकार करायला लाज वाटते. बुद्ध स्वतःच्या धर्माला पालीत अरीय-धम्म, संस्कृत मध्ये आर्य-धर्म, म्हणतात हा वैदिक धर्माचा प्रभाव नाही तर आजून काय आहे?

जगात अवतारवादाचा इतिहास पाहिलं तर सर्वात पहिले उत्तर जोराॅस्ट्रियन धर्मााच्या पंंथांमध्ये अवतारवादाची मांडणी झालेली दिसते ज्यातून विभिन्न धर्म दर्शनांनी ते आत्मसात केलं. त्यात पाश्चात्य देशातले पेगनांनी अवतारवाद काही रुपात स्विकार केले, तर पूर्व देशांमध्ये हिंदु वैष्णव संप्रदाय, काही टाओइस्ट पंथ आणि महायान बौद्ध यांनी अवतारवाद स्विकार केला. गौतम बुद्धांचा मानवी शारिरीक रुप, "संभोगकाया" आणि धर्मकायाचाच अवतार आहे असं मत मांडणारा बौद्ध धर्मच होता.

अवतारवादाचा मूळ पुनर्जन्म, पालीत पुनर्भाव, सिद्धांत पाहिल्ययावर पाली तिपिटक च्या खुद्दक निकाय मधला १४ वा ग्रंथ बुद्धवंस, आणि संस्कृत ललिताविस्तार सूत्रात नंतर गौतम बुद्ध  बनलेले राजकुमार सिद्धार्थ हे स्वतः तुषीत देवलोक अर्थात स्वर्गातले देवता बोधिसत्त/बोधिसत्व सुमेध चे पुनर्जन्म होते. हा एक प्रकारचा अवतारवादच झाला. मग अवतारिकरण हे स्वतः श्रमण पंथी करायचे, तर बुद्धांना विष्णुचा अवतार घोषित करण्यामागे षडयंत्र कसा दिसला यांना? 
श्रमण शब्दाचा सर्वात पहिला उल्लेख पण महाभारत, ब्राह्मण आणि आरण्यकात सापडतो ज्यात श्रमण हे सनातन धर्मी योगींचाच एक गट असायचे उल्लेख आहे. अर्थातच बुद्धांचा काळ येई परयंत श्रमण मत हे कालंतराने दार्शनिक मतामध्ये बदलत गेले तरी मूळ सनातन धर्म व याची प्रकृतिवाद होतं असा अनुमान लावला जाऊ शकतो. बौद्ध साहित्य वाचल्यावर एक गोष्ट कळते की बुद्धांनी अग्निहोत्र यज्ञ अर्थात होमाच्या विरोध एवजी परिवर्तन केला होता असं कळतं. उदाहरणासाठी त्रिपिटकात मझ्झिम निकाय मधला सेलसूत्तात संघ हा त्यागींमधे सर्वश्रेष्ठ आहे हे समजवायला बुद्ध म्हणतात की अग्निहोत्र हा यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि सावित्री मंत्र (गायत्री मंत्र) ही मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अशे अनेक उदाहरण सापडतात जिथं बुद्धांनी मनात अग्निहोत्र करारचा उपदेश दिला आहे. त्याच प्रकारे बुद्धांनी वेदांचा विरोध केला नव्हता, फक्त समकालीन ब्राह्मणांद्वारे वेदांवर विचार न करताच विश्वास ठेवणे या मानसिकतेचा व पोपटा सारखं रट्टा मारण्याचा विरोध केला होता. बुद्धांनी दिलेले सगळे नैतिक उपदेश हे वेदनुकूलच होते. त्यांचा आध्यात्मिक संकल्पना सुद्धा वेदांवरंच आधारित होतं... फक्त फरक एवढा होता की ते वेदांच्या योग मार्गांना अपूर्ण मानायचे व स्वतः शोध करुन बोध केलेल्या ९ व्या झान अवस्थेला पूर्णता मानायचे ज्याने अनात्म आणि अनित्य ह्या दोन विद्यांचा बोध होतो व व्यक्ति पुनः दुःखात पोहचत नाही. ८ व्या झान अवस्था परयंत हे वैदिक योगचेच चित्तलोक आहे हे डाॅ अलेक्जेंडर व्हाइन सारखे विद्वानांनी सिद्ध करुन दाखवला आहे. म्हणून बुद्धांना बंडखोर समझने आधुनिक काळातला गैैैैरसमज-पूर्ण कल्पना आहे जो बुद्धांवर थोपवली जात आहे.... आणि असं करणे अतिशय चुकिच आहे.

बुद्धांनी लोकांना स्वर्गनरकाच्या संकल्पनेतून बाहेर काढलं हे सुद्धा एक भ्रम आहे. बौद्ध धर्मात ३१ परलोकांची शिक्वण आहे ज्याचा ध्यानयोगाशी संबंध आहे, अग्दी वैदिक धर्मा सारखंच.

जर कोणताही व्यक्ति सम्यक संबुद्ध बनू शकतो तर मग गौतम बुद्ध नंतर किती सम्बुद्ध झाले आहेत डाॅ रूपा कुलकर्णी बोधींनी बौद्ध साहित्यांच्या आधारेवर सांगावं ?
अरहत आणि बुद्ध या दोघांमध्ये भरपुर फरक आहे. हे मात्र खरं आहे की अरहत व बुद्ध दोन्ही निर्वाण प्राप्त करणारे असतात पण अरहत हे कधिही बुद्ध नसतात व बुद्ध हे अरहतांपेक्षा आध्यात्मात श्रेष्ठ मानले जातात बौद्ध धर्मात. बुद्धांमध्ये जन्मापासूनंच ३२ लक्षणे असतात, अनंत पूर्व जन्मांचे सुकर्मांमूळे, जे इतर कोणामधेही नसतात. या ३२ लक्षणां व्यतिरिक्त आणखी ६ लक्षणे असतात जे कोणत्याही मनुष्य किंवा देवात नसतं.
म्हणून बुद्धांनी असं कधिही म्हंटल नव्हतं की, "मी देव नसून मानव आहे". त्यांनी स्वतः ला मानव आणि देव दोन्ही असायचे नकारले होते व ते या दोघांचे मार्गदर्शक किंवा गुरु असायचे म्हंटले आहे बौद्ध ग्रंथात.

▶️ डाॅ रूपा कुलकर्णी बोधी जींच्या प्रश्नाचा उत्तर असा आहे की आम्ही हिंदुंनी, ब्राह्मण असो की शूद्र, कधिही बुद्धांचा व बौद्धांचा द्वेष केला नाहिए आणि आज पण करत नाही. आम्हााल बुद्ध आवडत नाही अशी कल्पना बोधी जीं च्या  मनात कुठून उत्पन्न झाला याची कल्पना आम्हाला नाही पण एवढं ठाम पणेे सांंगू शकतो की कुलकर्णी बोधी जीं ना मोठा गैरसमज झाला आहे. मी स्वतः वैष्णव नाही, अवतारवाद मानत नसलो तरी सांगु शकतो की वैष्णवांनी बुद्धांना आदर व प्रेमभावनेनेच अवतार मानला आहे. आम्ही आर्य समाजी वैदिक सुद्धा गौतम बुद्ध ना महात्माच मानतो. आत्मा-अनात्मा, ईश्वर-अनिश्वर मध्ये मतभेद असले तरी इतर सगळ्या शिक्वणींना आमच्या धर्माच्या विसंगत मानत नाही. 

म्हणुन रूपा कुलकर्णी बोधींना आमचा सल्ला आहे की त्यांनी आंबेडकरवाद सारख्या विषेरी छद्म-वामपंथी विचारधारेचा नाद सोडून हिंदु व बौद्धांकडून उदारमतवाद आणि समन्वयवाद शिकून त्या खर्या अर्थाने बौद्ध बनले पाहिजे. अश्या खरया बौद्ध आमच्या दृष्टिकोणात हिंदुच ठरतात व दार्शनिक मतभेदांच्या (जे बौद्धांमध्ये आप आपसात पण असतातच) आधारेवर मनभेद निर्माण करु नये व हिंदु धर्माला विकृत पद्धतिने हीन दाखवुन स्वतः च्या मताची सुद्धा विकृति करुन श्रेष्ठ असायचे भ्रमात पडू नये. 

धन्यवाद.

Comments

  1. ये लेख हिन्दी मे नहि है?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

COMPARISON: Korean Shamanism & Hinduism

(Image source: Pinterest) J. M. Atkinson (1992) uses the plural term 'Shamanisms' in the article "Shamanisms  Today" citing M. Taussig (1989) that,  "S hamanism is… a made-up, modern, Western category, an artful rectification of  disparate practices, snatches of folklore and overarching folklorizations, residues of long-established myths intermingled with the politics of academic departments, curricula, conferences, journal juries and articles, and funding agencies",   she refutes the assumption that there is a uniform monolithic shamanism.    " Krinvanto Visham-aryam " meaning " Make the world noble " is an essential teaching of the Vedas. From the point of view of the historical texts within Indian traditions, of Hinduism, Jainism and Buddhism, one finds an interesting narrative again and again that the from the beginning of mankind till recent times, the entire world was filled with people who were either Aryas or else An...

DEBUNKING SURENDRA SHARMA: Timeline of Bhagavad Geeta and Brahma Sutras

नमस्ते। यह ब्लाॅग पोस्ट डाॅ सरेन्द्र कुमार शर्मा अज्ञात जी लिखित और विश्वबुक्स प्रकाशन संस्था प्रकाशित "श्रीमद्भगवद् गीता" पुस्तक [ISBN: 978-81-7987-862-0] के भगवद्गीता के आलोचना के खंडन हेतु दूसरा पोस्ट है। पहले पोस्ट मे हमने उनके पूर्वपीठिका के भाग "गीताः अंतरंगतः व बहिरंगतः" के युधिष्ठिर के मोह पर उनके आक्षेपों के उत्तर दिए। यह पोस्ट शर्माजी के पुस्तक के अगले भाग गीता के रचनाकाल संबंधित है। हिंदी मेरी मातृभाषा ना होने के कारण कई व्याकरणिक त्रुटियाँ इस पोस्ट पर मिलेंगे इसिलिए पाठकों से निवेदन हैं की वे इस दोष के लिए मुझें क्षमा करें और वाक्यों के भाव को समझें।  पूर्व पक्ष / आक्षेप (बिंद संक्षिप्त मे)- ■ भगवद्गीता वेदव्यासकृत ब्रह्मसुत्र के बाद लिखे गए थे क्यों की गीता १३/४ मे ब्रह्मसुत्र का उल्लेख है। ■ ब्रह्मसूत्र मे वैभाषिक, सौत्रांतिक, माध्यमिक और योगचार इन चार बौद्ध दर्शनों के खंडन होने के कारण ब्रह्मसूत्र सन् ४०० ईसा के बाद रचे गए। ■ इसिलिए गीता भी ब्रह्मसूत्र के बाद गुप्त साम्राज्य के काल मे रची गई। ■ बाद मे गीता को महाभारत मे मिला दिया ग...

DEBUNKING SURENDRA SHARMA: Answers to the Criticism of the Bhagvad Gita

।। ओ३म् ।। Image source: World Art Dubai नमस्कार। ४ नवंबर २०१९ के दिनांक, आज के दिवस सोमवार, मै ब्रह्मवीर ऋग्वेदी यह ब्लॉग पोस्ट लिखना प्रारम्भ कर रहा हू जिसका विषय श्रीमान डाॅ सुरेन्द्र कुमार शर्मा अज्ञात जी नामक लेखक के पुस्तक "श्रीमद्भगवद् गीता" [ISBN: 978-81-7987-862-0], विश्व बुक्स प्रकाशन, मे दिए भगवद गीता पर लगाए आरोपों का उत्तर देने व जहा आवश्यकता हो वहा खंडण करने लिख रहा हूँ। हिन्दी भाषा मेरी मातृभाषा न होने के कारण पाठकों से निवेदन है की इस लेख मे यदी कोई हिन्दी व्याकरणिक गलतियाँ मिले तो कृपया क्षमा कीजिएगा।  प्रस्तावना: हालांकी श्रीमान डाॅ सुरेन्द्र कुमार शर्मा 'अज्ञात' जी, जिन्हे मे यहा संक्षिप्त मे "शर्मा जी" या "डाॅ शर्मा जी" ऐसे संबोधित करुंगा, अधिक प्रसिद्ध लेखक नही है पर हाल ही मे मैंने इनके चर्चे कुछ आंबेडकरवादी मित्रों से सुने जहा इनके पुस्तकों के बारे मे पता चला। मेरे कुछ अन्य आर्य समाज से जुडे मित्र डाॅ शर्मा जी के अन्य हिंदु धर्म के विरुद्ध पुस्तकों के खंडन मे लगे है, मै स्वयं विश्वबुक्स प्रकाशित "...